| गोवे-कोलाड | वार्ताहर |
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित श्री.रा.ग पोटफोडे शाळेतील 1998-99 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी (दि.11) मुंबई-गोवा महामार्गावरील कवितके फार्म येथे आयोजित करण्यात आला.
पूर्वीच्या काळात आश्रमात असणाऱ्या गुरूंची चरण धुऊन जशी पूजा केली जात होती. तशी आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील गुरुजनांनी आपल्यावर केलेले संस्कार यामुळे आपण विविध क्षेत्रात नोकरी करू लागलो याची सामाजिक बांधिलकी राखत या शाळेचे माजी विद्यार्थींनी एकत्र येत शाळेचे मुख्यध्यापक म्हात्रे, शिक्षक खांडेकर, धनवी, भोसले, आंबेकर, खांडेकर, म्हसकर, नागोठकर, शाळेचे शिपाई शिंदे यांना फुलांचा वर्षाव करत सत्कार केला.
यावेळी माजी विद्यार्थी किशोर सावरकर, नरेंद्र पारठे, सचिन मोरे, महेश महाबळे, समीर बामुगडे, उमेश धामणसे, अजित निकम, लक्ष्मण वरखले, गोविंद कापसे, लिलाधर कापसे, मनोज चितळकर, गणेश मोरे, अंकुश टवले, निता पिंपळकर, सुगंधा घरट, योगिता सावरकर, रोशन सावरकर, शिल्पा म्हसकर, उपस्थित होते.