स्नेहल जगताप मातोश्रीवर; ठाकरे यांच्यासमवेत चर्चा

| महाड | प्रतिनिधी |

महाडचे माजी आ.स्व.माणिकराव जगताप यांच्या कन्या तथा माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली. यामुळे आगामी काळात महाडमध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

स्नेहल जगताप यांच्यासमवेत काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत ऊर्फ नाना जगताप हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. शिंदे गटाचे आ. भरत गोगावले यांना शह देण्यासाठी ठाकरे यांनी ही खेळी खेळल्याचे दिसून येते.

महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी पाच वर्षे केलेल्या कामाचाही उद्धव ठाकरे यांनी कौतुक केल. तसेच स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्याही कामाची प्रशंसा करत त्याच्या अकस्मात निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या भेटीच्या वेळी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई हे देखील सोबत होते. सुमारे अर्धा तास ठाकरे यांनी स्नेहल जगताप आणि नाना जगताप यांच्याशी चर्चा केली.

स्नेहल जगताप यांना चार ते पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचं बोललं जातं. अखेर दोन दिवसांपूर्वी जगताप-ठाकरेंची भेट झाल्याची माहिती आहे. स्नेहल जगताप शिवबंधन बांधणार का, अशा चर्चांनाही राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. मात्र ही निव्वळ सदिच्छा भेट असल्याचा दावा दोन्ही बाजूंनी केला जात आहे. परंतु 2024 मधील विधानसभा निवडणुकांच्या पाश्‍वर्र्भूमीवर आतापासूनच ठाकरेंनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं दिसतंय.

Exit mobile version