आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
। महाड । प्रतिनिधी ।
महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. स्नेहल जगताप सोमवारी (दि.28) अर्ज दाखल करणार असून यावेळी आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. याच सभेमध्ये माणगावचे चंद्रशेखर खानविलकर हे असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश करत असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पक्ष कार्यालयामध्ये गुरुवारी (दि.24) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्नेहल जगताप यांचा अर्ज दाखल आणि होणार्या प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी धनंजय देशमुख माजी नगराध्यक्ष संदीप जाधव माजी नगरसेवक सुदेश कळमकर, प्रमोद महाडिक आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्नेहल जगताप यांना अधिकृत तिकीट मिळालेले असून त्या 28 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच त्यावेळी भव्य रॅली निघणार असून रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. महाड विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचा प्रचार होण्याआधीच तळागाळामध्ये, गावागावात, वाडी-वाडीवर आमच्या प्रचार झाला असल्याचे देखील स्पष्ट केले. जुन्या पदाधिकार्यांना आणि नवीन पदाधिकार्यांना सोबत घेऊन महाड तालुक्यामध्ये नक्कीच बदल घडवू, असा विश्वास देखील धनंजय देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.