। पनवेल । वार्ताहर ।
26वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा कुरूक्षेत्र हरियाणा येथे सुरू असुन यात भारतातून प्रत्येक राज्याचे विजेते सहभागी झाले असुन त्यात महाराष्ट्रातर्फे नवी मुंबईची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने सबज्युनिअर गटात 30 अटीतटीच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवत सुवर्णपदक मिळवले असुन प्रथमच महाराष्ट्राला हे पदक मिळाले आहे.
सदरच्या स्पर्धेत भारतातून 42 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात अनेक राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग क्लबचे राज्यस्तरीय विजेते हे त्याचे राज्यातून विजेते हे सहभागी झाले होते. कुरूक्षेत्र येथील या स्पर्धेत रेकॉर्ड करीत स्नेहल शत्रुघ्न माळी रा.खारघर हिने सोनी स्पिंग क्लबचे आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट राजेंद्र सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण पदक महाराष्ट्राला मिळून दिले आहे. स्नेहल ही भारताकडुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व करणार आहे.