। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील पलायन केलेल्या कैद्याच्या खटल्याचा निकाल शुक्रवार 23 जुलै रोजी लागणार होता. मात्र त्या पूर्वीच सदर आरोपीने कारागृहाच्या कोव्हिड सेंटरचे गज कापून पळ काढला.
मात्र सुनावणीच्या पूर्वीच पळ काढल्याने आता सुनावणीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील सुमारे 68 कैद्यांना कोरोनाची नुकतीच लागण झाल्याची घटना घडली होती. जिल्हा कारागृहात कैद्यांची संख्या जास्त असल्याने यातील काही कैद्यांना नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या इमारतीत तात्पुरते कारागृह निगराणी कक्ष तयार करुन ठेवण्यात आले होते. या कैद्यांमध्ये पोलादपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेला नाईकू उर्फ देवा मारुती दगडे हाही आरोपी होता. त्यास १६ जानेवारी २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती व १९ जानेवारी २०१८ पासून देवा दगडे हा जिल्हा कारागृहात दाखल होता.
२० जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कैद्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेल्या नेहुली येथील कोविड आरोपी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून दगडे याने पलायन केले. या आरोपीचे शिक्षण बारावी पर्यंत झालेले आहे. व्यवसायाने वाहन चालक असलेल्या देवा दगडे याची उंची १६५ सेंमी आहे. याबाबत कोणासही माहिती मिळाल्यास अलिबाग पोलीस ठाण्याला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.