। रसायनी । वार्ताहर ।
गाडगीळ गुरुजी सामाजिक व शैक्षणिक संस्था गुळसुंदे यांच्या माध्यमातून मेडिकल कॅम्प, अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक व वैद्यकीय मदत, शस्त्रक्रियांसाठी मदत, निराधार महीलांच्या लेकींच्या विवाहासाठी मदत इ उपक्रम दरवर्षी राबवले जातात.
या वर्षी व्हीस्टा प्रोसेसफुड या कंपनीच्या सीएसआर फंडाच्या मदतीतून अदिवासींसाठी व अर्थिक दृष्ट्या सक्षम नसणार्या काही गरजवंत कुटुंबांसाठी सार्वजनीक शौचालय बांधुन देणे हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये तीन कुटुंबमिळून एक शौचालय अशी अभिनव कल्पना साकारण्यात आली. जेणेकरून शौचालय स्वच्छतेची जबाबदारी ही तीन कुटुंबे घेतील.
या उपक्रमात व्हीस्टा प्रोसेसफुड कंपनीचे एमडी भुपेंदर सिंग तसेच व्यवस्थापन सल्लागार व चंद्रशेखर सोमण यांचे सहकार्य लाभले. कंपनीतील प्लॅन्ट मॅनेजर प्रविण ठाकुर, प्रोडक्शन मॅनेजर नीलेश म्हात्रे, प्रणीत खुटले व इंद्रायणी यांनी उपक्रमात सहभाग घेतला.







