स्वराज्य संस्थेमार्फत सामाजिक उपक्रम

| नेरळ | वार्ताहर |

छत्रपती संभाजी युवराज यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य संघटनेच्या शाखा कर्जत तालुक्यातील प्रत्यक्ष गावात उघडण्यात येणार आहेत. असे विनोद साबळे यांनी जाहीर केले. कर्जत तालुक्यातील नांगुर्ले येथे स्वराज्य संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली. त्यावेळी स्वराज्य संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद साबळे बोलत होते. संघटनेच्या पदाधिकारी धनश्री दिवाणे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी सुनिल पाटील, राजेश लाड, अनिल भोसले, प्रथमेश मोरे, शशिकांत मोरे, अशोक मराजगे, किशोर देवघरे, ज्ञानेश्‍वर भालीवडे, भाऊ सनस, विलास चाळके, मोहन घाडगे, नंदू शिर्के, राजा पाटील, केतन निकम, आतिश साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

त्यावेळी जय हनुमान मंदिर नांगुर्ले येथे छोट्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. नांगुर्ले शाखेचे शाखेच्या सल्लागार समिती मध्ये मारुती भिलारे, अजय पवार, ओमकार धामणसे, योगेश कदम यांची तर शाखा कार्यकारिणी मध्ये शाखाप्रमुख अजित पवार, उपशाखाप्रमुख पारस कदम, कार्याध्यक्ष जयवंत पवार, सचिव विनोद मालुसरे, सहसचिव समीर चव्हाण, खजिनदार अविनाश म्हामले, सहखजिनदार समीर पवार, प्रसिद्धीप्रमुख कुमार पवार तसेच सदस्य म्हणून शुभम कदम, सनी पवार, यश मोरे, राज पवार, चैतन्य पवार आदींची निवड करण्यात आली. साबळे यांनी स्वराज्य संघटनेची कर्जत तालुक्यातील सुरुवात नांगुर्ले येथुन झाली असली तरी पुढील काळात संभाजी महाराज यांच्या हस्ते तालुक्यात स्वराज्य संघटनेच्या असंख्य शाखा स्थापन करणार असल्याचे सूतोवाच केले.

Exit mobile version