जेएसडब्ल्यू कंपनीची सामाजिक बांधिलकी

कांदळवनांना समुदायाचे पाठबळ

| अलिबाग/डोलवी | प्रतिनिधी |

जेएसडब्ल्यू फाऊंडेशन या 23 अब्ज डॉलर जेएसडब्ल्यू समूहाच्या सीएसआर विभागाने रायगड जिल्ह्यातील आपल्या सुरू असलेल्या तिवर पुनर्स्थापना प्रकल्पात एक मोठा टप्पा गाठला आहे. सध्या, 20 लाखांपेक्षा जास्त रोपे लावण्यात आली असून त्यांचा वाचण्याचा दर 70 टक्क्‌‍यांपेक्षा जास्त आहे आणि त्यांनी 380 हेक्टर जमीन व्याप्त केली आहे. 2016 पासून जेएसडब्ल्यू फाऊंडेशन ही संस्था पाणथळ जागा आणि त्यालगत भूपृष्ठ यांच्यातील जैव तटबंदीच्या वाढीसाठी काम करत आहे. त्यामुळे जमिनीची धूप व मृदेचा दर्जा घसरणे थांबेल आणि पीक घेण्याच्या क्षमतेचे नुकसान कमी होणार आहे. झाडांच्या विविध प्रजातींच्या अधिवासाच्या विकासाला चालना मिळेल. त्यात मासे, कोळंबी, प्रवाळ, खेकडे, सरपटणारे जीव आणि पक्षी यांचाही समावेश आहे.

या उपक्रमाचा एक प्रमुख घटक म्हणजे तिवरांच्या पुनर्स्थापनेप्रती जीवनमानाचा दृष्टीकोन समाविष्ट करणे होय. या प्रकल्पातून एकात्मिक शेती, पिशीकल्चर, घरगुती कुक्कुटपालन, तिवरांच्या रोपांचे रोपण आणि नर्सरींकडे त्यांची वाहतूक तसेच ज्यूट बॅग्ससारख्या पर्यावरणस्नेही उत्पादनांच्या निर्मितीद्वारे परिसरातील किनारपट्टीय समुदायासाठी पर्यायी उत्पन्नाचा मार्ग निर्माण झाला आहे.बियाणे गोळा करण्यापासून ते ज्यूट बॅग तयार करेपर्यंत, नर्सरी व्यवस्थापन आणि शेतात रूजवणे अशा विविध कामांमध्ये 200 पेक्षा जास्त स्वयंसहायता समूहातील 2000 पेक्षा अधिक महिलांनी प्रकल्पांच्या उपक्रमातून उत्पन्नच कमावले नाहीये तर त्यांच्या परिसरात तिवरांचे महत्त्व त्यांना कळले आहे. त्यांनी या प्रक्रियेत 5 कोटी रूपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावले आहे. महिलांना आपल्या उदरनिर्वाहात भर घालण्यासाठी टेलरिंग आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातूनही अनेकींना लाभ मिळाले आहेत.

स्थानिक मच्छिमार समाजाचेही आपल्या समाजातील तळ्यांचा वापर उदरनिर्वाहाच्या साधनांसाठी करून सक्षमीकरण झाले आहे. या प्रकल्पातून पिशीकल्चर, खेकडे वाढवणे, घरगुती कुक्कुटपालन आणि एकात्मिक शेतीच्या माध्यमातून उदरनिर्वाहाच्या माध्यमांचे वैविध्यीकरण करण्यात आले आहे. या प्रयत्नांमधून अतिरिक्त उत्पन्नाची साधने तर निर्माण झाली आहेतच, पण त्याचबरोबर स्थानिक समुदायाला शाश्वत आर्थिक संधींचा शोध घेण्यासाठी सक्षम करण्यात आले आहे.या पुनर्स्थापना प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीतून सामाजिक सहभाग आणि शाश्वत उदरनिर्वाहाचे महत्त्व पर्यावरणाच्या संवर्धनात किती आहे, हे दिसून आले आहे. यातील सर्व समभागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे फक्त तिवरांचे पर्यावरणच सुधारले नाही तर त्यांनी स्थानिक समुदायांच्या आयुष्यातही सुधारणा केली आहे.

डोलवी गावात सध्या सुरू असलेला तिवर पुनर्स्थापना आणि संवर्धन प्रकल्प आमच्या पर्यावरण आणि जनतेप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. तिवर पुनर्स्थापना प्रकल्पाचा प्रभाव आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. पर्यावरण व्यवस्थापनाला आसपासच्या परिसरातील समाजाच्या तात्कालिक आणि दीर्घकालीन गरजांशी जोडले पाहिजे, जेणेकरून राहणीमान आणि पारंपरिक समृद्धीचा ऱ्हास होणार नाही.

अश्विनी सक्सेना,जेएसडब्ल्यू

जागतिक तिवर दिन
तिवरांबाबत जागरूकता आणखी वाढवण्यासाठी फाऊंडेशन दरवर्षी 26 जुलै रोजी जागतिक तिवर दिन अत्यंत उत्साहात साजरा करते. जागरूकता सत्रे, शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, तिवरांच्या महत्त्वाबाबत अंतर्गत संवाद आणि मँग्रोव्ह्ज सेलच्या प्रतिनिधींकडून विविध सत्रे हे काही महत्त्वाचे उपक्रम मागील पाच वर्षांपासून आयोजित केले गेले आहेत, जेणेकरून जागरूकता वाढीला लागेल आणि तिवरांच्या शाश्वत व्यवस्थापन व संवर्धनाला प्रोत्साहन मिळेल. हे हस्तक्षेप प्रामुख्याने तिवरांच्या वातावरणाला पुनर्स्थापित करणे, स्थानिक समाजाला सक्षम करणे आणि तिवरांच्या स्त्रोतांचे सक्षम व्यवस्थापन व संवर्धन यांना प्रोत्साहन देण्यावर भर देतात.

Exit mobile version