रोटरी क्लबची सामाजिक बांधिलकी

कृत्रिम पाय, हातांचे मोफत वितरण

| रसायनी | वार्ताहर |

रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा व रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, ATOSच्या CSR सहाय्याने रीस येथील गुड हेल्थ हॉस्पिटलमध्ये मोफत कृत्रिम पाय व हात वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण तीन रुग्णांना कृत्रिम हात देण्यात आले.

दरम्यान, 50 रुग्ण (1 कृत्रिम पायासाठी) आणि 5 रुग्ण (दोन्ही पायांसाठी) या शिबिरामध्ये उपस्थित होते. अध्यक्ष रेश्मा सुनील कुरुप यांनी बोलताना सांगितले की, आज गरजवंतांचे पायांचे मोजमाप घेण्यात आले आणि 10 सप्टेंबर रोजी त्यांना पुन्हा कॅम्पला बोलावून कृत्रिम पायांचे वितरण करणार आहोत. हा प्रकल्प काही महिन्यात दुसऱ्या शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येईल, अशी ग्वाही रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष कैलास देशपांडे व प्रोजेक्ट चेअरमन पंकज झामरे यांनी दिली. या प्रकल्पासाठी पाताळगंगा अध्यक्षा रोटेरियन रेश्मा कुरूप, सचिव सुशांत उचिल, प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन सुनील कुरूप, सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर मेडिकल डॉ. मिलिंद भगत, सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर नॉन मेडिकल रोटेरियन गणेश काळे, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष कैलाश देशपांडे, प्रोजेक्ट चेअरमन पंकज झामरे, नामदेव चौधरी, सुखदा देशपांडे, शिला सबनीस, डॉ. लेख उचील, डॉ. धीरज जैन, दीपक चौधरी, गणेश म्हात्रे, सचिन थोरात, देवेंद्र महिंद्राकर, अमित शहा, शशिकांत शानभाग, गणेश मेणसे, संदीप साबळे, उमाताई मुंढे, शारदा काळे, वर्षा पाटील, प्रतीक्षा कुरंगळे, एंजल सुंदर, मेघा कोरडे, डॉ. सागर कांबळे, सुनील भोसले आणि सौ भारती म्हात्रे, नेत्रा चौधरी, उषा मेणसे, डॉ. शितल भगत, डॉ. स्वीटी जैन, समृद्ध उचिल, रोट्रॅक्टरचे अध्यक्ष अनिकेत व इतर 5 रोट्रॅक्टर्स या प्रकल्पात सहभागी झाले होते.

तसेच प्रोजेक्टसाठी दिव्यांगांच्या मदतीस धनंजय गीध आणि त्यांची रेस्क्यू टीम यांचीसुद्धा फार मदत झाली. रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे प्रोजेक्ट चेअरमन सुनील कुरूप यांनी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आणि क्लबचे अध्यक्ष कैलाश देशपांडे आणि त्यांच्या टीम सदस्यांचे आभार मानले. अध्यक्ष रेश्मा कुरूप ह्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version