पी.एन.पी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी शिबिर नुकतेच नागावमधील सायरस पुनावाला सी.बी.एस.सी. इंग्लिश मीडियम स्कूल येथे पी.एन.पी.महाविद्यालयात घेण्यात आले. या शिबीरामध्ये शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यांनी विद्यार्थ्यांना स्ट्रेस इन युथ या विषयावर मार्गदर्शन केले. दरम्यान मिल्क बॅग रिसायक्लिंग प्रकल्पाचे अनावरण चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन नागाव ग्रामपंचायतच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, संचालक विक्रांत वार्डे, प्रा. रवींद्र पाटील, प्रा.दिनेश पाटील, प्रा.केतकी पाटील, प्रा. पूजा पाटील, प्रा.श्वेतल झिंजे, प्रा. मिलिंद घाडगे, सुबोध पाटील इत्यादी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
निवासी शिबिर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रमुख कार्यक्रमाधिकारी व हिंदी विभाग प्रमुख प्रा. पल्लवी पाटील यांचे विशेष कौतुक करण्यात आले. सात दिवसीय शिबिरात, सामाजिक, शैक्षणिक आरोग्य विषयक माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय माने यांनी एच.आय.व्ही या विषयावर शिबिरार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर एच.आय.व्ही. एड्स, ब्लड ग्रुप, सी.बी.सी आदी आरोग्य तपासणी करण्यात आली. विक्रांत वार्डे यांनी शिबिरार्थींना ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना आपला आत्मविश्वास वाढविण्याची प्रेरणा दिली. या दिवशी शिबिरार्थ्यांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता केली.
या शिबिरांतर्गत रोजच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये भारत स्वाभिमान ट्रस्ट रायगड केंद्रातर्फे दिलीप घाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना योगाचे आरोग्यदायी महत्त्व पटवून दिले. शुभांगी कदम, सक्षम फाउंडेशन खारघर यांच्या तर्फे विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील एकूण 100 एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाले होते. ‘नीड ऑफ एन.एस.एस. वॉलेंटियर फॉर सोसायटी’ या विषयांतर्गत पी.एन.पी. ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रवींद्र पाटील, लेखक व दिग्दर्शक प्रा. मनीष अंसुरकर यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राबद्दल व्याख्यान दिले. माझा कचरा माझी जबाबदारी या विषया अंतर्गत पाणी व स्वच्छता विभागाचे कार्यक्रमाधिकारी जयवंत गायकवाड यांनी ‘कचरा व्यवस्थापन’ सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यात कसे पुढे जावे याबाबत आणि करिअर विषयी उत्तमरित्या मार्गदर्शन केले.
यावेळी भूपेंद्र पाटील यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. शाश्वत विकास समन्वयक यशदा, पुणे येथील गणेश खातू यांचे सुशील साईकर यांनी शुन्य कचरा व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. स्वच्छ भारत सुंदर भारत या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी गावामध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबवले. एड्स जनजागृती पथनाट्य सादर करून जनजागृती पर रॅली काढून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. परिसरातील कचरा गोळा करून, प्लॅस्टिक गोळा करून परिसर स्वच्छ केला. राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ.प्रा.तुळशीदास मोकल यांनी शिबिरार्थ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. शिबिराचा समारोप ध्वजारोहण करून करण्यात आला.