वन महोत्सवसाठी सामाजिक वनीकरण सज्ज

दीड लाख रोपे तयार
| नेरळ | वार्ताहर |
वन विभाग दरवर्षी लाखो झाडांची लागवड जून ते सप्टेंबर महिन्यात वन महोत्सव साजरा केला जातो. यावर्षी कर्जत तालुक्यात वृक्षलागवड करण्यासाठी कर्जत सामाजिक वनीकरण विभागाने तब्बल दीड लाख रोपे लावण्यासाठी तयार आहेत. दरम्यान, कर्जत तालुक्यातील सामाजिक संस्था आणि शासकीय संस्था यांच्या माध्यमातून वन महोत्सव काळात वृक्षलागवड करण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

सामाजिक वनीकरण विभाग दरवर्षी पावसाळ्यात वृक्षलागवड करीत असते. त्यासाठी सहा महिने सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्जत लाडीवली येथील नर्सरी येथे हे काम सुरु होते. गेली काही वर्षे वन विभागाने वन महोत्सवाची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आणि राज्यात पावसाळ्यात लाखो वृक्षांची लागवड केली जाते.

यावर्षी कर्जत तालुक्यात वन महोत्सव काळात मोठ्या प्रमाणात झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी लाडीवली येथील नर्सरीमध्ये तब्बल एक लाख 58 हजार झाडे यांची रोपे तयार झाली आहेत. त्या ठिकाणी तब्बल 42 प्रकारची रोपे तयार करण्यात आली असून, त्यात शोभिवंत, जंगली झाडे तसेच औषधी वनस्पती यांची निर्मिती प्रामुख्याने करण्यात आली आहे. तर, जमिनीची धूप थांबवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या बांबू या वृक्षाची तब्बल एक लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. ही सर्व रोपे गेल्या सहा महिन्यांपासून घेतलेल्या मेहनत यामुळे तयार करण्यात सामाजिक वनीकरण विभागाला यश आले आहे. त्यासाठी वनपाल मोहन चव्हाण, वनरक्षक वनिता राणे यांच्या मदतीला 15 वन मजूर ही कामे करीत होते.
कर्जत तालुक्यात 5 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सव साजरा होत आहे.त्यासाठी एक लाख 58 हजार रोपे तयार करण्यात आली असून, स्थानिक संस्था, महाविद्यालय, शाळा यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण अल्प दरात रोपे उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरणाचे वनक्षेत्रपाल पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version