। तळा । वार्ताहर ।
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे समाजसेवा शिबीर मुरुड तालुक्यातील खामदे या गावामध्ये पार पडले. या शिबिराचे उद्घाटन कमलाकर थोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ, शिबिरार्थी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.उद्घाटनानंतर विद्यार्थ्यानी मंदिर परिसर व मुख्य रस्त्यांची स्वच्छता केली. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राध्यापक डॉ भगवान लोखंडे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. लोखंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थ्यांबद्दलचे विचार समजावून सांगितले. यानंतर रात्री विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिबिराच्या दुसर्या दिवशी सकाळी गावामध्ये साफसफाई करण्यात आली. तद्नंतर दुपारी इंदापूर कॉलेजचे प्राध्यापक हज्जू सर यांनी श्रमसंस्काराचे महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले.