किशोर धारिया यांचे प्रतिपादन
| पेण | प्रतिनिधी |
कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असला तरीसुद्धा तेथील महिलांच्या डोक्यावरचा हंडा आजही उतरला नाही. आजही येथे येणाऱ्या दूषित पिण्याच्या पाणीपुरवठ्यामुळे झालेल्या कावीळ आजाराने मुलांचे मृत्यू झाले. याचा गांभीर्याने विचार करून शिवसेनेचे युवा नेते समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेत वढाव गावात सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करून समाजहिताचे कार्य घडविले असल्याचे प्रतिपादन हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी केले.
पेण तालुक्यातील वढाव येथे सहयाद्री जलशुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी तहसीलदार सुभाष म्हात्रे, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, ज्येष्ठ समाजसेवक वसंत ठाकूर, क्षमा म्हात्रे, कॉंग्रेसच्या नंदा म्हात्रे, शिवसेनेचे प्रदीप वर्तक, कांतीलाल म्हात्रे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.