। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे गावातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या जिविता सुरज पाटील यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कोल्हापूर येथील येळगुड येथे आयोजित कार्यक्रमामध्ये लोकसेवा आयोग महाराष्ट्र राज्याचा आदर्श नारीरत्न पुरस्कार-2022 करुणा धनंजय मुंडे यांच्या हस्ते हा विशेष पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करून गौरविण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन दैनिक हिंदू सम्राट वृत्तपत्राचे संपादक उत्तमराव कागले, किरण किल्लेदार यळगुड शहराध्यक्ष, सचिन पाटील शहर उपाध्यक्ष यळगुड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमात करुणा धनंजय मुंडे संस्थापक अध्यक्षा शिवशक्ती सेना पक्ष महाराष्ट्र राज्य सेवा संघटना, सिने अभिनेत्री माधुरी पवार, माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश अण्णा आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडेसो, जयश्री गाठ नगराध्यक्ष हुपरी, सुनिता हजारे सरपंच यळगुड, अबोली जिगजिनी संचालिका ए.जे. फाउंडेशन, प्रा.किशोर पाटील निवृत्त शिक्षक कोएसो.ना ना.पाटील हायस्कूल पेझारी, वैजयंती पाटील इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. जिविता पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.







