पत्रकार संघटनेचा समाजाभिमुख उपक्रम- डॉ. गुणे

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल- नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे पनवेल परिसरातील गरीब-गरजू, विद्यार्थी आणि नागरिकांना 33 सायकलचे वाटप गुरूवारी (दि.15) करण्यात आले. यावेळी अनेकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे , शिवसेना महानगर प्रमुख पनवेल प्रथमेश सोमण, ओरियन मॉल मालक डॉ. गिरीश गुणे, मंगेश परुळेकर, उद्योजिका हर्षला तांबोळी, मुख्य वितरक सदाशिव बिराजदार, ॲड. मनोहर सचदेव, गोरखनाथ पोळ, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मयूर तांबडे, उपाध्यक्ष समीर वेश्वीकर, सचिव दीपक घरत, दीपक जगे, अशोक गोरडे, रमेश भोळे, दीपक कांबळे, मिलिंद खारपाटील, पंकज तांबडे उपस्थित होते.

पत्रकारांनी राबवलेला हा समाजाभिमुख उपक्रम असल्याचे डॉक्टर गिरीश गुणे यांनी सांगितले. आपण समाजाच काहीतरी देणं लागतो त्या अंतर्गत हा स्तुत्य उपक्रम राबवला, याबद्दल त्यांनी पत्रकार संघटनेचे कौतुक केले. पत्रकारांच्या बातमीपेक्षा सायकल वाटप हा वेगळा अँगल असून हा अनेकांना समाधान देणारा कार्यक्रम आहे असे मत व्यक्त केले. विविध पक्षातून असे उपक्रम केले जातात मात्र पत्रकार संघातर्फे सायकल वाटप कार्यक्रम घेणे ही कौतुकाची बाब असल्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. कोणताही कार्यक्रम करताना अडचणी येतात आणि जो काम करतो त्यालाच अडचणी येतात. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरता 33 सायकल दिलीत ही सोपी गोष्ट नाही. हे काम खूप मोठे असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. सायकल मिळाली, त्याचा सदुपयोग करा आणि चांगले शिक्षण घ्या, असे ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी सांगून त्यांनी पत्रकार संघटनेचे कौतुक केले. पत्रकार जेव्हा सक्रिय भूमिकेत उतरतात तेव्हा असे कार्यक्रम घेतले जातात, असे माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी सांगितले.

Exit mobile version