| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या रोटरी क्लब देवनार यांच्याकडून बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेसाठी सोलर पॅनल भेट दिले. या सोलर पॅनलमुळे शाळेतील विजेचा प्रश्न निकाली निघणार आहे. तर, शाळेत पावसाळ्यात पाण्याचे नियोजन करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम देखील भरत देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ देवनार तर्फे बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सोलर पैनल सिस्टीम व रेन वॉटर हार्वेस्टिंग भेट देण्यात आले. बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलर पॅनलचे अनावरण रोटरी क्लब ऑफ देवनारच्या अध्यक्षा अलका मुरली यांचे हस्ते झाले. यावेळी रोटरीयन कन्नन, इलेक्टेड अध्यक्षा नलिनी कन्नन, रोटरीयन आजित पप्पू, मुरेंद्रनाथ, कर्जत तालुका समन्वयक अर्जुन तरे, शेटकरी ग्रामीण मंडळ दत्तात्रय पाटील, भरत खांडेकर, अरुण मसणे, प्रकाश सोनावडे, सिताराम बदे, भरत खेडेकर, मारती बागडे देशमुख व मानिवली येथील हुतात्मा स्मारक समितीचे सर्व सदस्य, जितेंद्र गतर्फ व लहू डायरे आदी आवर्जुन उपस्थित होते.







