महाडमध्ये राबविणार घनकचरा व्यवस्थापन

जीवनविद्या मिशनचा स्त्युत्य उपक्रम
। महाड । प्रतिनिधी ।
‘पर्यावरण हाच नारायण, झाड म्हणजे शंकराचे रुप, पर्यावरणाला जपा म्हणजे तो आपल्याला जपेल’ असे क्रांतिकारी सिद्धांत माडणारे सद्गुरु वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनतर्फे या वर्षी कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असल्याने जागतिक पर्यावरण दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा केला. यावेळी घनकचरा व्यवस्थापनाची नवीन मोहिम गावागावातुन सुरु करीत असल्याचे प्रल्हाद पै यांनी जाहीर केले. सदरचा कार्यक्रम ऑनलाईन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभाला पर्यावरण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येऊन पर्यावरणाचे महत्व वाढले असुन त्याचे जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरापालिकेचे कार्यकारी अभियंता डॉ.अजित साळवी यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे महत्व आणि त्याची सविस्तर माहिती दिली.

त्याचप्रमाणे पर्यावरणाचे महत्व आणि भविष्यांमध्ये पर्यावरणाकडे प्रत्येकाने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर जीवनविद्या मिशनचे तयार केलेले पर्यावरणावरील गीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता सद् गुरु वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाद पै यांच्या मार्गदशक विचारांने झाले. जीवनविद्या मिशन आता घनकचरा व्यवस्थापनाची नवीन मोहिम गावागावांतून सुरु करीत असल्याचे प्रल्हाद पै यांनी जाहीर केले.

Exit mobile version