आदिवासी समाजाचे प्रश्‍न सोडवा

। खोपोली । प्रतिनिधी ।
तालुक्यातील आदिवासी कातकरी प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच समस्या जाणून घेण्यासाठी तहसीलदार आयुब तांबोळी यांनी लक्ष घालावे अशी मागणी सोलापूर आदिवासी बांधवांच्या वतीने करण्यात आली. शुक्रवारी बिरसा मुंडा जयंती निमित्ताने तहसीलदार आयुब तांबोळी आदिवासी भवन कार्यक्रमात उपस्थित होते. आदिवासी भवन येथे खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या उपस्थितीमध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तालुक्यात आदिवासी कातकरी समाज मोठ्या प्रमाणात असून अद्याप विकासाची गंगा वाडी वस्ती पर्यंत पोचलेली नाही. शैक्षणिक मागासलेपणामुळे वीज, पाणी, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा देखील अनेक वाड्या-वस्त्यांवर नसून त्या सोडवण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी आदिवासी समाज सांस्कृतिक भवन खालापूरचे अध्यक्ष मारुती पवार यांनी केली. विविध मागण्यांची पूर्तता व्हावी या करिता लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी समाजातील कार्यकर्ते कैलास पवार, दिलीप डाके, अनंता पवार, शंकर होला, बबन वाघमारे सह अनेक जण उपस्थित होते. तहसीलदार तांबोळी यांनी प्रशासकीय मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

Exit mobile version