शैक्षणिक समस्यांचे निराकरण

आ.बाळाराम पाटील यांचे प्रतिपादन,माणगावमध्ये शिक्षक मेळावा
| माणगाव | प्रतिनिधी |
गेल्या सहा वर्षात कोकण विभाग शिक्षक विभागाचा आमदार म्हणून शिक्षण क्षेत्राशी निगडित असणार्‍या सार्‍या प्रश्‍नांवर, समस्यांवर आपण प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न केला असे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आ.बाळाराम पाटील यांनी माणगाव येथे मेळाव्यात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना सांगितले. माणगाव टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज येथे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या जाहीर झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी आमदार .बाळाराम पाटील यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

.यावेळी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुभाष केकाणे,शेकाप नेते अस्लम राऊत,पनवेल को-ऑप.बँकेचे चेअरमन बाबुराव पालकर, तालुका चिटणीस रमेश मोरे,तालुका राष्ट्रवादीच्या संगीता बक्कम,जे.बी.सावंत एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब सावंत,माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, नगरसेविका ममता थोरे, उणेगाव सरपंच राजू शिर्के, देगाव उपसरपंच दिनेश गुगुळे, तालुका शेकाप सहचिटणीस राजेश कासारे, जिल्हा चिटणीस मंडळाचे नामदेव शिंदे,अ‍ॅड.कौस्तुभ धामणकर,गोविंद पवार,सुमित काळे,सौरभ खैरे,विजय आंब्रे,राजू करकरे,महेश सुर्वे,स्वप्नील दसवते,नितीन वाघमारे,राजू मुंढे, स्वप्नील सकपाळ,रामदास पुराणिक,प्रा.हर्षल जोशी यांच्यासह शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात तब्बल लाखभर शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यात मी यशस्वी होऊ शकलो.त्यासाठी शासनाजवळ सतत पाठपुरावा व प्रसंगी आंदोलने केली.शिक्षणाला पाठबळ देणारा वैधानिक गट तयार करून अशा मागच्या निवडणुकीत मी बोललो होतो.महाराष्ट्राच्या विधी मंडळात शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी,समस्यांसाठी मुंबई येथे आझाद मैदानात वेळोवेळी आंदोलने केली,शिक्षकांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.सव्वा दोन वर्ष कोविड काळात आपल्या सर्वांची वाया गेली.मी केलेल्या कामांचा निश्‍चितपणे आपण सर्वांनी मूल्यमापन करून मला या निवडणुकीत सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या मेळाव्यात निलेश थोरे यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या परीने वैयक्तिक 51 हजार रुपयांचा धनादेश मा.आ.बाळाराम पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.शेवटी टीएमसी कॉलेजचे प्रा. हर्षल जोशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून संवाद मेळाव्याची सांगता केली.

गेल्या सहा वर्षात आपण मतदार संघात जेवढी चांगली कामे करता येथील त्यासाठी विशेष प्रयत्न केले. ज्या शिक्षकांनी आपल्याला निवडून दिले.त्या सर्व शिक्षकांना अभिमान वाटेल असे काम करण्याचा मी प्रयत्न केला. – आ.बाळाराम पाटील

Exit mobile version