सोमय्यांचा मोर्चा आता मुंबईतील अनधिकृत गगनचुंबी इमारतींवर

। मुंबई । वृत्तसंस्था ।

विविध प्रकारचे घोटाळे बाहेर काढून राजकाऱ्यांना जेरी आणणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांनी आता त्यांचा मोर्चा मुंबईतील अनधिकृत गगनचुंबी इमारतींवर वळवला आहे. मुंबईत अनेक बिल्डरांकडून इमारतींना ओसी मिळण्यासाठी प्रयत्नच केले गेलेले नसून, यामुळे रहिवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावे लागत आहे.

याबाबत त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे विशेष ऑडिट करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे. तसेच नोएडामधील अनधिकृत टॉवर्सवर ज्याप्रमाणे कारवाई करण्यात आली त्याप्रमाणे मुंबईतील अनधिकृत इमारतीचं काय? असा सवाल उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे.

काल नोएडातील अनधिकृत ट्विन टॉवर पाडण्यात आले. तसेच मुंबईत भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेले शेकडो अनधिकृत टॉवर आणि हजारो अनधिकृत मजले गेली अनेक वर्ष बांधण्यात आले आहेत. त्यामुळे लाखो कुटुंबिय चिंतेत आहे. माझ्या माहितीप्रमाणे 25 हजाराहून फ्लॅटधारक ओसी न मिळाल्याने चिंतेत आहेत. त्यामुळे 25 हजाराहून अधिक मध्यमवर्गीय सदनिकाधारकांचे रक्षण करण्याची मागणी आपण शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे केल्याचे किरीट सोमय्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Exit mobile version