ईर्शाळगड दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्री जुई गडकरींनी सांगितल्या काही गोष्टी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
इर्शाळवाडीत अजूनही बचावकार्य सुरू आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी पोस्ट करत संवेदना व्यक्त केल्या. शिवाय मदतीचा हातही देऊ केला. अभिनेत्री जुई गडकरीने काही दिवसांपूर्वी इर्शाळगडावर तिने केलेल्या ट्रेकच्या आठवणी जाग्या केल्या होत्या. आता अभिनेत्रीने या ठिकाणच्या लोकांसाठी मदतीचा हात देऊ केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून इर्शाळवाडीतील लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.

जुईने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असे लिहिले आहे की, ‘इर्शाळवाडीसाठी मदत पाठवायची असेल तर कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण इ. जीवनावश्यक वस्तू तिथपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जातील.’ अभिनेत्रीने तिच्या पोस्टमधून मदतीने आवाहन केले असून जुईची ही पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टनुसार तिच्या टीमच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना इर्शाळवाडीवासियांना मदत करता येईल. जुई इर्शाळगड याठिकाणी काही दिवसांपूर्वी ट्रेकसाठी गेली होती. तिने या ट्रेकदरम्यानत्या इर्शाळवाडीतील आठवणी शेअर केलेल्या. तिने त्याठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांच्या हातचं जेवण जेवल्याची आठवण सांगितली. ही बातमी पाहताच अभिनेत्रीने याठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी प्रार्थना केली होती.

ईर्शाळगडावर गेलो तेव्हाच्या काही आठवणी आज ताज्या झाल्या. सकाळपासुन ईर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची बातमी बघतेय आणि डोकं सुन्नं झालंय. तिथल्या आऊच्या हातचा स्वयंपाक अजुनही आठवतोय. एव्हढ्या ऊंचावर असलेली ठाकरवाडी, विज नाही, मेडीकल नाही, जिवनावश्यक वस्तु असं वरती ठकरवाडीत काहीच नाही. तरीही सदैव चेहरा हसरा…कसं काय जमतं त्यांना? प्रत्येक वेळेला १-१.३० तास चढुन वर जाणं किती अवघड आहे. पण तरीही कसलीही तक्रार न करता खुप कष्ट करुन मानाने जगतात ही ठाकरं… माझ्या खुप जवळचा विषय आहे ठाकरं आणि ठाकरवाड्या… कितीतरी वाड्यांवर मी फिरलिये… त्यांच्या हातचं चविष्ठं जेवलिये… बातमी बघुन खुप वाईट वाटलं… सगळे सुखरुप असुदेत.

जुई गडकरी, अभिनेत्री
Exit mobile version