रायगडच्या सुकन्येची उंच भरारी

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

जिद्द, मेहनत व चिकाटी या जोरावर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला या छोट्याश्या गावातील तरुणी सोनाली निनाद इडेकर हिने मेकअप आर्टिस्ट म्हणून नावलौकिक मिळविले आहे. मेकअप आर्टिस्ट, साडी ड्रेपिस्ट, हेअर स्टायलिस्ट, या कामात त्यांचा हातखंडा आहे. आत्तापर्यत तिने अनेक दिग्गज कलाकारांचा मेकओवर केला आहे. ही कला इतरही महिलांनी आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी सोनाली या काही दिवसांत सोनालीज् मेकओवर मास्टर क्लासेस सुरु करणार आहे. त्याद्वारे अनेक तरुणी व महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Exit mobile version