सोनाली तेटगुरेचे एमपीएससी परीक्षेत यश

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव तालुक्यातील मुळ ढालघर गावच्या ग्रामीण भागात राहणारी सोनाली राजेंद्र तेटगुरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन हिने ओबीसी प्रवर्गात महाराष्ट्रातून पहिल्या पाच क्रमांकात येण्याचा मान मिळविला. तिने प्राप्त केलेल्या उज्वल यशाबद्दल माणगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तिचे तालुक्यातून सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

तिचे वडील राजेंद्र तेटगुरे हे माणगाव तालुक्यातील साई ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक पदावर कार्यरत असून आई रश्मी तेटगुरे या गृहिणी आहेत. तिचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण रा.जि.प प्राथमिक शाळा ढालघर येथे झाले. तर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशोकदादा साबळे विद्यालय व जुनिअर कॉलेज माणगाव येथे झाले.

बारावीनंतर तिने लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन डिग्री कोर्से 2016 मध्ये पूर्ण केल्या त्यानंतर तिने हिंजलवाडी जि. पुणे आयटी पार्क येथे तीन वर्ष नोकरी केल्यानंतर तेथे राजीनामा देऊन तिने एमपीएससी करून उच्च पदस्थ अधिकारी व्हावे हा उद्देश बाळगून एमपीएससीच्या अभ्यासक्रमावर विशेष लक्ष केंद्रित करून तिने पुणे येथे एमपीएससीची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 18) लागून सोनाली ओबीसी प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

Exit mobile version