श्री गणेश गोवे आयोजित क्रिकेट स्पर्धेत सोनार सिद्ध धाटाव संघ विजेता

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील श्री गणेश गोवे येथे गोवे-खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मर्यादित क्रिकेट सामन्यांचे आयोजन रविवारी (दि. 4) करण्यात आले. या क्रिकेटचा अंतिम सामना गावदेवी गावठाण विरुद्ध सोनार सिद्ध धाटाव यांच्यात झाला. या अटीटतीच्या रोमहर्षक सामन्यात सोनारसिद्ध धाटाव संघ अंतिम विजेता संघ ठरला. क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन नरेंद्र जाधव, संदिप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितीन जाधव, राजेंद्र जाधव, सचिव शरद वारकर, लिलाधर दहिंबेकर, पांडुरंग जाधव, जयसिंग पवार, सुनिल दहिंबेकर, सहिंद्र पवार, मधुकर जाधव, नंदकुमार वाफिळकर, धनेश घरट, अरुण दहिंबेकर, महादेव जाधव, रामचंद्र कापसे, तसेच असंख्य क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

सामन्यात उत्कृष्ट गोलंदाज किल्ला संघाचा नितेश, उत्कृष्ट फलंदाज गावठाण संघाचा सागर, तर मालिकावीर किल्ला संघाचा दिपेश ठरला. या स्पर्धेत गावदेवी गावठाण संघ द्वितीय, सुयंभू किल्ला संघ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सर्व विजेता संघास मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. सर्व क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री गणेश गोवे मंडळाचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version