सोनिया गांधी यांची ईडीद्वारे चौकशी: अलिबाग येथे काँग्रेसचे सत्याग्रह

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीद्वारे पुन्हा चौकशी करण्यात आली असून त्याविरोधात ठिकठिकाणी काँग्रेस आक्रमक होताना दिसून येत आहे. सोनिया गांधी यांच्या विरोधात सुरु असलेल्या चौकशीविरोधात अलिबागमध्ये आज (मंगळवार, दि.२६ जुलै) अलिबाग येथील काँग्रेस भवन येथे करून सत्याग्रह करण्यात आला. यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून सोनिया गांधी यांना आपले समर्थन दर्शविले.

यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश मगर म्हणाले, कितीही संकटे आली तरी काँग्रेसच्या संस्कृती
मध्ये बदल झालेला नाही. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ६३ वेळा पक्षात मतभेद झालेले आहेत. असे असले तरीही काँग्रेस पक्षाचे अस्तित्व दिवसेंदिवस भक्कम होत आहे. भाजपच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या विरोधात ईडीच्या नोटीसा पाठवणे या गोष्टी नवीन नाहीत. हे आधीपासूनच सुरू आहे. कोणाला आणि कश्याप्रकारे त्रास द्यायचा याचेही राजकारणात काही नियम आहेत. परंतु हल्ली ते नियमही पाळले जात नाहीत. या कृत्यामुळे केंद्र सरकार मधील मंडळी जनमानसाच्या मनातुन उतरून जातील. इडीमुळे सगळ्यांची मुस्कटदाबी होत आहे.

यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष ॲड जे टी पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रद्धा ठाकूर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश मगर, प्रदेश प्रतिनिधी हर्षल पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष ॲड प्रथमेश पाटील, विधानसभा युवक अध्यक्ष ॲड कौस्तुभ पूनकर, तालुका एन एस यु आय अध्यक्ष प्रज्वल पडोले, मोनिका पाटील, भास्कर चव्हाण, मुझफ्फर चौधरी यांच्यासाहित कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version