| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा थोडा यशस्वीच राहिला असे म्हणता येईल भारतीय संघाने द. आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत दिमाखदार विजय मिळवला. शिवाय, खेळवण्यात आलेल्या एकाही मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला नाही. दरम्यान, भारताचा कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित आणि भारतीय संघाला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यावरुन भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय संघाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले.
काय म्हणाले सौरव गांगुली? भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर देत म्हणाले, भारताचा संघ अतिशय चांगला आहे. एखाद्या सामन्यात पराभव झाला की, भारतीय संघाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. लोक असे काही बोलतात की वाटावे भारताच्या संपूर्ण संघाची कामगिरी सुमार आहे. भारतीय संघाने एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी या तिन्ही मालिकांमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. हे अतिशय चांगले संकेत आहेत.







