साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन

घरातच सापडला मृतदेह

साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांचे निधन झाले असून घरातच त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला असून टॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यावर शोक व्यक्त केला आहे.

प्रकाशजी हे त्यांच्या घरी एकटेच राहत होते. त्यांच्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी ‘मिजियिथलिल कन्नीरुमयी’ (1987) या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्या त्रपटाला जाणकारांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 2013 मध्ये आलेला ‘पट्टुपुष्ठकम’ हा शेवटचा चित्रपट होता. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश यांच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. ज्यावेळी त्यांचे नातेवाईक प्रकाश यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना ते घरातच मृतावस्थेत आढळले. प्रकाश यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून साऊथ इंडस्ट्रीतून सेलिब्रेटींच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहे. त्यात प्रकाश कोलेरी यांच्या बातमीनं साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिका मलिका राजपूत यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर आता 65 वर्षीय दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांच्या निधनानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version