‘याच्या’साठी सिडकोकडे जागा उपलब्ध करण्याची मागणी

| उरण | वार्ताहर |
नवघर गावात दफनभूमीची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे. दफनभूमीसाठी पुरेशी योग्य जागा उपलब्ध नसल्याने लहान मुलांच्या अंत्यसंस्काराचा, दफनविधीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे लहान मुलांचा अंत्यविधी दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष जयप्रकाश नारायण पाटील यांनी पत्रव्यवहाराद्वारे सिडको, ग्रामपंचायतचे सरपंच, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण कार्यालय यांच्याकडे केली आहे.

नवघर गावात सिडकोने बांधलेल्या स्मशानालगत विद्युत डीपीचे काम चालू आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा सिडकोकडून लहान मुलांचा दफनभूमीत जागा उपलब्ध करून न दिल्याने या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत नवघर गावातील ग्रामस्थांना दफन करावे लागत आहे. परंतु या ठिकाणी डीपीचे काम चालू आहे, तसेच सदर चालू असलेल्या डीपीची जागा बदलून दुसर्‍या जागेवर बांधावी किंवा नवघर ग्रामस्थांना लवकर लहान मुलांसाठी दफनभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी. जोपर्यंत लहान मुलांना दफनभूमीसाठी जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत काम थांबविण्यात यावे, अशी मागणी जयप्रकाश पाटील यांनी सरपंच, तहसीलदार, सिडको कार्यालय, महावितरण वीज कार्यालय यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केले आहे.

बांधण्यात येणार्‍या डीपीच्या जागेसाठी सिडकोकडे कोणत्याही प्रकारचे परवानगी घेण्यात आलेली नाही. ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता ग्रामपंचायतीमार्फत ते काम चालू आहे. त्यामुळे विद्युत डीपी दुसरीकडे लावण्यात यावी.
जयप्रकाश पाटील,
अध्यक्ष-ग्रामस्थ मंडळ, नवघर

Exit mobile version