स्पेन युरो चॅम्पियन! नोंदवला जागतिक विक्रम

इंग्लंडने चार जेतेपद घेत जर्मनीला टाकले मागे

| यूरोप | वृत्तसंस्था |

युरो चषक 2024 स्पर्धेची फायनल कमालीची चुरशीची राहिली. तीन वेळचा विजेत्या स्पेनने पहिल्या 45 मिनिटांत वर्चस्व गाजवल्यानंतर इंग्लंडवर दडपण निर्माण केले आहे. तिच लय कायम राखताना स्पेनने 47व्या मिनिटाला निको विलियम्सच्या अप्रतिम गोलच्या जोरावर आघाडी मिळवली. पहिल्या युरो चषक विजयाच्या शोधात असलेल्या इंग्लंडला 73व्या मिनिटाला कोल पाल्मरने बरोबरी मिळवून दिली आहे. पण, स्पेन हार मानणारे नव्हते आणि 87व्या मिनिटाला मिकेल ओयारझबालच्या भन्नाट गोलने स्पेनला पुन्हा आघाडी मिळवून दिली. स्पेनने 2-1 अशा विजयासह (1964, 2008, 2012, 2024) सर्वाधिक चार युरो चषक स्पर्धेची जेतेपदं नावावर करताना जर्मनीला ( 1972, 1980, 1996) मागे टाकले.

युरो चषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दोन युवा खेळाडू फायनल खेळले. स्पेनकडून लामिने यमाल (17) व इंग्लंडकडून कॉबी मैनू (19) या युवा खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधले होते. स्पेनकडून सातत्याने इंग्लंडच्या पेनल्टी क्षेत्रावर आक्रमण सुरू राहिले. इंग्लंडच्या बचावफळीला स्पेनचे डावपेच सेट होऊ देत नव्हते. स्पेन गोलखाते उघडेल असे वाटत असताना इंग्लंडच्या स्टोन्सने सुरेख बचाव केला आणि इंग्लंडच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. पण, यानंतर इंग्लंडचे खेळाडू चेकाळले आणि पुढील 2 मिनिटांत गोलचे प्रयत्न केले परंतु स्पेनच्या गोल झाला नाही.

पहिल्या हाफमध्ये स्पेनचे वर्चस्व राहिले असले तरी इंग्लंडकडून झालेले 2-3 प्रयत्न हे त्यांची चिंता वाढवणारे नक्कीच होते. युरो चषक स्पर्धेच्या एका पर्वात 4 सहाय्य करणारा लामिने यमाल हा (17, 1दिवस) इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला. इंग्लंडसाठी महत्त्वाच्या स्पर्धेत नॉक आऊट सामन्यात गोल व सहाय्य करणारा कोल पाल्मर हा पहिला खेळाडू ठरला आहे.

Exit mobile version