चाकरमान्यांसाठी विशेष बस

। सुधागड -पाली । वार्ताहर ।
गौरी गणपती सणाच्या निमित्ताने प्रवाशांच्या मागणीनुसार वाफेघर ते ठाणे, बोरीवली ही परिवहन महामंडळाची विशेष बस सेवा मंगळवारी (दि.6) व बुधवारी (दि.7) सुरू करण्यात आली. या सेवेला चाकरमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही बस सकाळी 10 वाजता वाफेघर येथून बोरीवलीकडे (सुकुरवाडी) रवाना झाली. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर झाला.

चाकरमान्यांनी ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांचे व परिवहन महामंडळाचे आभार मानले. ही बससेवा सुरू करण्यासाठी एसटी प्रवासी संघटना मुंबई, महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष शांताराम अमृत जुवळे, सुरेश मराठे, जय चव्हाण, विभाग नियंत्रक परिवहन महामंडळ रायगड अनघा बारटक्के, रुचिता राजेश बेलोसे, रविंद्र लहाने, उध्दर ग्रामपंचायत सरपंच व कुंभारशेत ग्रामपंचायत सरपंच, ग्रामीण विकास संघर्ष समिती, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ व सर्व सदस्यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

Exit mobile version