पीएम किसान अंतर्गत विशेष मोहिम

प्रलंबित कामे पूर्ण करण्यसाठी तळा कृषी विभागाचे प्रयत्न

| तळा | वार्ताहर |

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.) योजनेच्या संपृक्तता साध्यतेसाठी तालुक्यात डिसेंबर ते जानेवारी, 2024 या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत तालुक्यातून 123 स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोदणी करण्यात आली, तथापि, तालुक्यात एकुण 515 शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई-केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे मुख्यतः सामाईक सुविधा केंद्रांमार्फत प्रमाणिकरण करण्यासाठी दि. 12ते 21 फेब्रुवारी या कालावधीत आणखी 10 दिवसांची संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. या मोहिमे दरम्यान केवळ प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकचे सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकाऱ्यांचे मार्फत प्रमाणिकरण पूर्ण करावे. शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रणाणिकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी,सामाईक सुविधा केंद्र, पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा.

पी. एम. किसान योजने अंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. तालुक्यातून बँक खाती आधार संलग्न करणे बाकी 727 शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी आपल्या सोईनुसार प्राधान्याने नजीकचे पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा 16 वा हप्ता माहे फेब्रुवारी. 2024 च्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करणार आहे.

Exit mobile version