| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील नांदगाव या गावामध्ये राहणारे कोकबन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण जैन यांचा मुलगा डॉ. दर्शन जैन याने एम.डी. होण्यासाठी नीट पीजी परीक्षेत उत्तीर्ण होत संपूर्ण देशातून 20 वा क्रमांक पटकाविला आहे. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल दर्शन जैन याचा जंजिरा मेडिकल असोसिएशनतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच पुढील शिक्षणासाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी डॉ. राज कल्याणी, डॉ.संजय पाटील, डॉ. मंगेश पाटील, डॉ.हितेश जैन, डॉ. वासिम पेशमाम, डॉ. अनंत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दर्शन जैन याने सांगितले की, आई-वडिलांच्या आशीर्वादामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मी यापुढे एमडीचे शिक्षणदेखील पूर्ण करेन.