। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।
विराट कोहलीही टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यात सहभागी झाला नसला तरी मात्र विराट या स्पर्धेत थैमान घालण्यासाठी सज्ज आहे. न्यूयॉर्कला पोहोचल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विराटचा विशेष सन्मान केला. विराट कोहलीने 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. विशेष एकदिवसीय विश्वचषकामध्ये कोहलीने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते कोणीही विसरू शकत नाही. 2023 या वर्षी विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. एकदिवसीय विश्वचषकात कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम केला होता. आता न्यूयॉर्कमध्ये आसीसीने विराट कोहलीला प्लेयर ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ज्याचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.