माणगावात कलगी-तुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळ रायगड-रत्नागिरीची विशेष सभा उत्साहात

माणगाव | वार्ताहर |
कलगी-तुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळ रायगड-रत्नागिरीची विशेष सभा माणगाव कुणबी भवन येथे शनिवार, दि.25 सप्टेंबर रोजी दुपारी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेत शक्ती-तुरा मंडळाची स्मरणिका तयार करणे व मंडळाच्या सांस्कृतिक भवनाकरिता रायगडचे खा. सुनील तटकरे व पालकमंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांची भेट घेण्याचे ठरले.
या सभेत मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन होऊन ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले.तसेच मंडळाच्या इमारतीबाबत चर्चा होऊन प्रत्येक घराण्याची वंशावळी तयार करण्याचे ठरले. मंडळाच्या उन्नतीसाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे. शक्ती-तुरा मंडळाची स्मरणिका तयार करणे, तसेच मंडळाचे सांस्कृतिक भवन उभारणे, ताडदेव घराण्याची वंशावळ पूर्ण झाली असून, उर्वरित शक्तीवाले यांनी वंशावळ सादर करावी, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या सभेत सभेचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे, रायगड कोलाड मंडळाचे अध्यक्ष सुरेश महाबळे, मंडणगड, रत्नागिरी अखिल भारतीय शाहीर परिषद अध्यक्ष श्रीधर कदम यांच्यसह अनेक मान्यवरांनी मौलिक असे मार्गदर्शन उपस्थितांना केले. या सभेला माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम, मंडळाचे महाड येथील सचिव अंकुश जाधव, माणगाव येथील सचिव नथुराम पाष्टे, मंडणगडचे गणपत जंगम, महाडचे सहादेव उतेकर, म्हसळ्याचे रामचंद्र म्हात्रे, मुंबई मंडळाचे माजी खजिनदार अनंत तेलमकर, शाहीर वसंत भोईर, गोविंद शिंदे, सखाराम गुगळे, भात्रे सर, वामन बैकर यांच्यासह आजी, माजी गुरुवर्य, वस्ताद, शाहीर आणि कलावंत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version