मालवण, रत्नागिरी, देवगडसह कोकणातील किनारी भागांसाठी खास योजना; मोदींची घोषणा

| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |

चिपी विमानतळ आता सुरु झालं आहे. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर माझगावपर्यंत जोडणार आहे. इथल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील विशेष योजना बनवण्यात येत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील रहिवासी भागांना वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी खारफुटी वनस्पती वाढवण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारनं यासाठी विशेष मिश्टी योजना बनवली आहे, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली.

भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी मालवणमध्ये आले होते. त्यापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उद्धाटन पार पडले. मालवण, आचरा, रत्नागिरी, देवगड, विजयदुर्गसहित महाराष्ट्रातील अनेक विभागांची खारफुटी वनस्पतीच्या व्यवस्थापनासाठी निवड करण्यात आली आहे. यामुळं वारसा आणि विकास हाच विकसित भारताचा मार्ग आहे. त्यामुळं या क्षेत्रात आपल्या गौरवशाली परंपरेच्या संरक्षणाचा प्रयत्न केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे जलदुर्ग बनवले गेले त्यांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रात यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. आमचा प्रयत्न आहे की देशभरातून लोकांनी आपला हा गौरवशाली वारसा पहायला आलं पाहिजे. इथून आपल्याला विकसित भारताची यात्रा अधिक तीव्र करायची आहे.

Exit mobile version