‌‘घे भरारी‌’चे खास प्रदर्शन सुरू

| पनवेल | प्रतिनिधी |

‌‘घे भरारी‌’ फेसबुक ग्रुपतर्फे लग्नसराईसाठी खास साड्या, कॉर्पोरेट साड्या, दागिने, आणि देण्याघेण्यासाठी असंख्य भेटवस्तूंचे भव्य प्रदर्शन पनवेलमध्ये भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन खास नवव्यावसायिक आणि स्त्री उद्योजिकांच्या सहभागातून पनवेल येथील अटलांटिक बँकवेत येथे सुरू करण्यात आले असून शुक्रवारी (दि.23) सुप्रसिद्ध अभिनेते अभिजित केळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

घे भरारी हे प्रदर्शन दि.23 ते 25 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळात नागरिकांसाठी खुले असणार आहे. पनवेलमधील अटलांटिक हॉलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर हे प्रदर्शन भरवले आहे. यामध्ये अद्वितीय अश्या सजावटीच्या वस्तू, अत्युत्तम दागिने, विविध प्रकारचे कपडे, उत्तम परफुम्स, कुर्ती, पर्सेस, हातमागाच्या वस्तू, कालाकुसरीच्या असंख्य वस्तू, हॅन्डमेड सोप्स, हस्तकलेच्या अनेक वस्तू, पिशव्या व खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल या प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. घे भरारीमध्ये ऑन लाईन आणि ऑफ लाईन असे काम चालते. नवीन व्यवसायात येणाऱ्या उद्योजकांसाठी घे भरारी हे हक्काचे व्यासपीठ झाले आहे. समाज माध्यमांच्या माध्यमातून मोठा ग्राहक वर्ग याला जोडला गेला आहे. यामध्ये 80 पेक्षा जास्त छोटे व्यावसायिक व महिलांनी भाग घेतला आहे. यामधील व्यावसायिक हे ठाणे, मुंबई, पुणे व इंदूर येथून आले आहेत. या सर्व छोट्या व्यावसायिकांना आणि अनेक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, तसेच मराठी तरुणांमध्ये व्यवसायाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्राहकांनी जरूर भेट द्यावी, असे आवाहन घे भरारी समूहाचे संस्थापक राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांनी केले आहे.

बाहेर बाजारात बघायला न मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या एक्सकलुसिव्ह साड्या आणि कपडे येथे बघायला मिळत आहेत. तसेच, भेट वस्तुंसाठी अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. उत्कृष्ट दर्जा, वाजवी किंमत आणि उत्तम व्यावसायिक हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. तरी सर्व पनवेलकरांनी आवर्जून या प्रदर्शनास भेट द्यावी आणि आपल्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा.

– मृणाल देशपांडे, अभिनेत्री

Exit mobile version