| मुंबई | प्रतिनिधी |
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखों वारकरी पंढरीकडे रवाना होतात. यंदाही भाविकांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने वारकऱ्यांसाठी 54 आषाढी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. नागपूर, नवी अमरावती, खामगाव, लातूर, भुसावळ, पुणे आणि कोल्हापूर येथून पंढरपूर व मिरजकडे या विशेष गाड्या धावणार असल्याने वारकऱ्यांच्या प्रवासाची मोठी सोय होणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर-मिरजदरम्यान चार आरक्षित विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक 01205 विशेष गाडी 23 व 24 जुलै रोजी सकाळी 8.50 वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता मिरजला पोहोचेल, तर ट्रेन क्रमांक 01206 विशेष गाडी 24 व 25 जुलै रोजी दुपारी 12.55 वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल.
वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या
