| मुंबई | प्रतिनिधी |
जपान येथे नुकत्याच पार पडलेल्या जपान ओपन आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत काव्य आणि भाग्य या घोलम बंधूंनी जोरदार कामगिरी केली आहे. दोघांनी एका सुवर्णपदकासह 3 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली आहे.
विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या इंग्लिश माध्यमात सातवीत शिकत असलेल्या काव्य घोलमची तसेच खार एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून भाग्य घोलमची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या इव्हेंटमध्ये काव्य व भाग्य या दोघांनी जबरदस्त कामगिरी करताना 1 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कांस्यपदक पटकावून आपल्या देशाचे, राज्याचे, शाळेचे आणि आई-वडिलांचे नाव जागतिक पातळीवर उज्वल केले आहे. त्यांना प्रशिक्षक म्हणून अरविंद चव्हाण व विभावरी चव्हाण या दोघांचे मार्गदर्शन लाभले.
घोलम बंधूंची जोरदार कामगिरी
