| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासन व जिल्हा क्रीडा नेहरु युवक यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुका स्तरीय पावसाळी मैदानी ( मुलगे 17 वर्ष वयोगट ) स्पर्धा 24 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 17 वर्षे वयोगटात पीएनपी माध्यमिक शाळा वेश्वी गोंधळपाडा या शाळेतील इयत्ता 10 वीचा विद्यार्थी हिमांशू निर्मल याने लांब उडी या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला, 17 वर्ष वयोगटात 1500 मीटर धावणे या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला, तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये दोन्ही प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त करून हिमांशू निर्मल हा विद्यार्थी जिल्हातरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय मुलींच्या मैदानी स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटामध्ये लांब उडी या प्रकारात इयत्ता 9 वीची विद्यार्थिनी जिविका जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकावला, 17 वर्ष वयोगटात 800 मिटर धावणे मध्ये इयत्ता 10 वीची विद्यार्थिनी कार्तिकी संजय हिने प्रथम क्रमांक पटकावला, 17 वर्ष वयोगटात 3000 मिटर चालणे या क्रीडा प्रकारात इयत्ता 10 वीची विद्यार्थिनी नंदिनी निकम हिने प्रथम क्रमांक पटकावला.
त्याचप्रमाणे पीएनपी माध्यमिक शाळा वायशेत मधील 14 वर्ष वयोगटाखालील गटात 200 मीटर धावणे मुस्तफा राइन हिने द्वितीय क्रमांक तसेच गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची निवड जिल्हा पातळीवर निवड झाली असून तो तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे तसेच ओमकार वाघमारे याने 17 वर्षाखालील गटात भालाफेक या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
वरील सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, पीएनपी वेश्वी गोंधळपाडा शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पीएनपी वायशेत शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.







