पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

| अलिबाग | प्रतिनिधी |

पनवेल येथे अटल जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात पीएनपी होली चाईल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत सर्व चार विभागांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत. विशेष म्हणजे सर्व विभागांमध्ये चारही पारितोषिके मिळवणारी पीएनपी ही एकमेव शाळा ठरली आहे. या प्रदर्शनात इलेक्ट्रॉनिक विभागात अर्नव पालकर प्रथम क्रमांक, मेकॅनिकल विभागात दिनेश राऊत प्रथम क्रमांक, डिजिटल विभागात अर्नव पालकर द्वितीय क्रमांक व थीम आधारित प्रकल्प विभागात पार्थ परदेशी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत मार्गदर्शक शिक्षिका प्रगती भोसले, इक्रा कूर आणि सुविद्या पाटील यांनाही प्रशस्तीपत्र व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या नेत्रदीपक यशाबद्दल विजेते विद्यार्थी, सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, होली चाईल्ड एस.एस.सी. बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले तसेच उपमुख्याध्यापिका शर्मिला शेटे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version