। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील नवघर – खोपटा रस्त्यावरील बाँमण लाँडी यार्ड जवळ सोमवारी (दि. 8) दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात भेंडखळ गावातील अमोल काळूराम ठाकूर (38) हा तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला.
मिळालेल्या माहितीनुसार, भेंडखळ गावातील अमोल ठाकूर हा तरुण आपल्या मोटारसायकल वरुन खोपटा गावाकडे सोमवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास जात असताना नवघर – खोपटा रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ट्रेलरने अमोलच्या मोटारसायकला जोरदार धडक दिली व अमोलला काही अंतरावर फडफड नेले. या झालेल्या अपघातात अमोल ठाकूर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर कंटेनर ट्रेलर ताब्यात घेतला. यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. या अपघाताची माहिती भेंडखळ गावातील नागरिकांनी पोलीसांना दिली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सदर तरुण हा भेंडखळ गावातील रहिवासी असून, त्यांच्या मागे पत्नी दोन लहान मुले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







