भरधाव ट्रकची वाहतूक पोलीस उपनिरीक्षकाला धडक

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा औद्योगिक वसाहतीमधून मुंबई व पुणेकडे जाणाऱ्या रोडपाली फुड लॅण्ड येथील उड्डाणपुलावर भरधाव ट्रकने पोलीस उपनिरीक्षकाला धडक दिल्याची घटना घडली. सध्या जखमी पोलीस उपनिरीक्षकावर उपचार सुरू आहेत.

वाहतूक विभागात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक शैलेश भर्दे हे पोलीस हवालदार आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानासोबत स्वतः वाहतूक नियमन करत होते. अचानक तळोजाच्या दिशेने उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने ट्रकचालक 42 वर्षीय गौतम जाधव रा. कर्जत, अहमदनगर याने ट्रक सेवा रस्त्याला वळविताना रस्त्याकडेला नियमनाचे काम करणाऱ्या उपनिरीक्षक गर्दै यांना धडक दिली. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.   

Exit mobile version