जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर; काही भागात कापणीची कामे खोळंबलीत
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
पाताळगंगा परिसरात भात कापणीची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला असला तरी सध्या पीक चांगले बहरले आहे. वाढती मजुरी व मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला लागले आहेत. बहुतांश ठिकाणी अद्यापही पारंपरिक पद्धतीने कापणी, झोडणीची कामे सुरू झाली आहेत. तापमान वाढू लागल्याने भल्या पहाटे शेतकरी व शेतमजूर शेतात दाखल होत आहेत.
ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे भात शेती शेतात अडवी झाली. यामुळे हातात मिळेल ते धान्य घ्यावे, तसेच परतीच्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात भात कापणी समवेत भात झोडणी सुरु केली आहे. हातामध्ये भाताचा दाणा मिळावा या विचारांने शेतीच्या कामाची लगबग सुरु झाली असल्यांचे पहावयांस मिळत आहे. परतीच्या पावसाने भात शेतात पडले असून, या वर्षी सुद्धा शेतीचे मोठे नुकसान झाले. मात्र, भात कापणी केली नाहीतर हाताला दाणा मिळणार नाही. सकाळ भात कापणी आणी दुपार नंतर शेतात भात झोडणी सुरु असल्यांचे पहावयांस मिळत आहे. कारण सायंकाळी पाऊस केव्हा येईल यांची शाश्वती नाही. मात्र, या वेळेतच घरातील सदस्य तसेच शेत मजूर घेवून भात कापणी समवेत भात झोडणी शेतात सुरु आहे. परतीच्या पावसाच्या भीतीने, शेतकरी आजही चिंताग्रस्त झाले आहे. सूर्याच्या उत्तम प्रकाशाने कापलेली भात (कडपा) शेतामध्ये सुकून, शेतामध्ये झोडणी शेतकऱ्यांनी चालू केली. या वर्षी परतीच्या पावसाने घात केला असून शेतकऱ्याकडे असणारे गुरे, वासरे यांना पेंढा, चारा मुबलक प्रमाणात मिळणार नाही. याची चिंता जणू शेतकऱ्याला लागली आहे. अजून काही भागात भात शेती कापणीची कामे खोळंबली आहे. तर काही अल्प शेतकऱ्यांनी भात कापणी झाली आहे.
पावसात पेंढा भिजल्याने कुजलेला आणि बुरशी आलेला हा पेंढा जनवारांच्या खाण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही शेतकऱ्याने पिकविलेला भात सुरक्षित ठिकाणी ठेवला असला तरी गुरा-ढोरांच्या चाऱ्यासाठीचा पेंढा ठेवला होता. भिजलेला हा पेंढा आता कूजु लागला असून त्यावर काळी बुरशी येऊ लागली आहे.
पेंढा कुजलेला
गुरा-ढोरांच्या खाण्यालायक पेंढा राहिलेला नाही. रानातील हिरवे गवत देखील आता सुकले आहे. अशा परिस्थितीमध्ये दुभत्या जनावरांचा आणि ढोरांना खायला काहीच राहिले नसल्याने काही दिवसांतच जनावरांवर उपासमारीची वेळ येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे.
