स्पाईस रेस्टॉरंटतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

| अलिबाग | प्रतिनिधी ।

‘रक्तदान श्रेष्ठदान’ या मानवतेच्या संदेशाला उजाळा देत चौल-रेवदंडा बायपास रोडवरील स्पाईस रेस्टॉरंटतर्फे ‘एक पाऊल समाजासाठी’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन रक्तदान करावे, हीच या शिबिरामागची भावना असल्याचे आयोजकांनी सांगितले.

‘रक्तदान ही केवळ जबाबदारी नाही, ती मानवतेची भावना आहे,’ असा प्रेरणादायी संदेश देत या उपक्रमातून समाजातील रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रक्तदानाद्वारे अनेक जीव वाचवता येतात, या जाणिवेचा प्रसार करण्यासाठी स्पाईस रेस्टॉरंटकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी परिसरातील युवक-युवती, सामाजिक संघटना व नागरिकांना या शिबिरात सहभागी होऊन समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version