| भाकरवड | प्रतिनिधी |
आगरी सामाजिक संस्था अलिबाग आयोजित अध्यात्मिक परिषद देहेन येथे डॉ.अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड मानसी म्हात्रे, ॲड.गौतम पाटील, साहित्यिक चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी मानसी म्हात्रे म्हणाल्या, आगरी संस्था उपक्रमशील संस्था असून दरवर्षी या संस्थेमार्फत गुणवंतांचा सन्मान केला जातो. ही प्रशंसनीय बाब आहे. आगरी भवन निर्माण झाले कि, संस्थेचे सामाजिक कार्य आणखीन गतिमान होईल, असा मला विश्वास वाटतो.
गौतम पाटील म्हणाले, जे गुणवंत जे कर्तृत्ववंत ते आगरी होय.आगरी नेहमीच प्रत्येक कार्यात पुढे असतात.कोकणसिंह नारायण नागू पाटील यांच्यापासून सुरू झालेली ही कार्यकर्तृत्वाची पताका अशीच फडकत राहील. अध्यक्षीय भाषणात अविनाश पाटील म्हणाले, अलिबाग म्हणजे ज्ञानाचे आगर असून इथे अनेक चळवळी व आंदोलने यशस्वीपणे पार पडली आहेत. वारकरी संप्रदायाचे उगम व प्रवास या बाबत त्यांनी ऊहापोह केला. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणातून वारकरी संप्रदाय व संतजन यांचा संबंध आपल्या भाषणातून स्पष्ट केला. प्रारंभी सुवर्णा भगत यांनी ईशस्तवन सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प.जगन्नाथ राऊत यांनी केले तर, उपस्थितांचे स्वागत संस्थाध्यक्ष कैलास पिंगळे यांनी केले.आभार प्रदर्शन संदेश पिंगळे यांनी केले.सूत्रसंचालन सुदेश जुईकर यांनी केले. सुभाष म्हात्रे, सिद्धेश पाटील, रवी पाटील, रेखा मोकल, वनिता पिंगळे, जयश्री म्हात्रे, किमया पिंगळे, राजश्री पाटील, प्रकाश मिसाळ, गोरख पाटील, पद्माकर म्हात्रे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
चंद्रकांत म्हात्रे, मिरीग पाटील, मच्छिंद्र पाटील, शैलेश पाटील, महेंद्र ठाकुर, गोरखनाथ पाटील, विद्या म्हात्रे, वनिता पाटील, प्रमोद पाटील, सुनील म्हात्रे, धनाजी पिंगळे, प्रमोद जुईकर, महेंद्र जुईकर, शशिकांत पाटील, प्रल्हाद पाटील,अरुण पाटील, अमरनाथ भगत, संतोष पाटील यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्रेया पिंगळे, श्रमिका पाटील, सृष्टी पाटील, डॉ.श्रद्धा शेळके, शंतनु मोकल, शुभम पिंगळे, आकाश पिंगळे, नंदेश गावंड यांचा सत्कार करण्यात आला. काव्य लेखन स्पर्धेतील विजेते नरेश पाटील, बी.एन.पाटील, शिवाजी मोकल, रवींद्र पाटील यांना बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमासाठी पत्रकार जीवन पाटील, काशिनाथ नागावकर, विलास म्हात्रे, स़ंतोष पिंगळे, सुरेश खडपे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.







