| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील देहेन गावचे रहिवासी रायगड भूषण निष्ठावंत वारकरी वैकुंठवासी विद्याधर निलकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्रिदिनी श्री ज्ञानेश्वरी पारायण, नववा अध्याय, बारावा अध्याय व पंधरावा अध्याय, किर्तन, प्रवचन, सोहळा 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या वेळी करण्यात आले होते.
या तीन दिवसीय कार्यक्रमात ध्वजारोहण प्रतिमापूजन, विणा, मृदुंग, टाळ पूजन, ग्रंथ पूजन कलश पूजन ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी 4 ते 5 या वेळेत जगन्नाथ राऊत देहेन यांचे प्रवचन सायंकाळी साडेपाच ते साडेसहा सामुदायिक हरिपाठ, राजमाता वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी देवाची आळंदी शिवानी शिंदे, रडू नको बाळा फेम गायिका देवाची आळंदी, रात्री सात ते नऊ सुदाम हिंगे आळंदी देवाची यांचे कीर्तन श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ धेरड यांचे हरिजागर दुसऱ्या दिवशी 5 ते 7 काकडा, 7 ते 9 विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण पद्माकर म्हात्रे तळाशेत यांचे प्रवचन, कीर्तन सेवा सात ते नऊ शिवशाहीर अमित बळवली पेण, साडेपाच ते साडेसहा हरिपाठ सामुदायिक, दिवस तिसरा काकडा, श्रीमद् भागवत गीता प्रार्थना, नववा बारावा पंधरावा अध्याय तसेच परमपूज्य वडिलांच्या वर्षश्राद्धाचे दर्पण पूजन सकाळी दहा ते बारा पुष्प वृष्टी व काल्याचे किर्तन हरिभक्त पारायण गोविंद शेलार श्री क्षेत्र त्रंबकेश्वर नाशिक, भजन सेवा अभय राम संन्यासाश्रम डोळवी बुवा एकनाथ महाराज, बहिरेश्वर प्रासादिक भजन मंडळ मानी अजित यांचे तर या कार्यक्रमासाठी सहभाग व सहकार्य अलिबाग व पेण तालुक्यातील हरिपाठ मंडळ, भजन मंडळ, महिला मंडळ ग्रामस्थ, व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ देहेन, शिवज्योत प्रतिष्ठान देहेन यांनी भाविक भक्तांसाठी अल्पोपहार भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.







