| भाकरवड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील धेरंड येथे दि.23 ते 27 जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रँथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायनाचे आयोजन येथील दत्त मंदिर घटनाचे तळे येथे ग्रामस्थ मंडळ धेरंड, मोठे शहापूर व धाकटे शहापूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या पाच दिवशीय सप्ताहात सुप्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तन कार यांचा समावेश होता. तसेच, या ठिकाणी काल्याची कीर्तन सेवा गोविंद शेलार यांची ठेवण्यात आली होती. आपण भगवंताच्या सानिध्यात राहून परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. कलियुगात भजन, प्रवचन, कीर्तन याला महत्त्व दिले तर आपण सर्व व्याधीतून मुक्त होऊन आत्मिक सुखाची प्राप्ती सहजपणे मिळू शकते, असे बोधपर विचार आपल्या कीर्तन रुपी सेवेतून उपस्थित भाविक भक्तांना सांगितले. या सप्ताहातील श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाची समाप्ती ॲड कुंदन पाटील यांनी केली.
आध्यात्मिक सप्ताहाचा किर्तनाने समारोप
