। पनवेल । प्रतिनिधी ।
महविकास आघडीचे अधिकृत उमेदवार मा. आ. बाळाराम पाटील यांचा पनवेल शहर प्रचार दौरा बुधवारी (दि.6) आयोजित करण्यात आला होता. बाळाराम पाटील यांना प्रचार दौर्या दरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. यावेळी जागोजागी माता-भगिनींनी बाळाराम पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच, युवकांनी जोरदार घोषणा देत आमदार बाळाराम पाटील यांच्या विजयाचा जयघोष केला. बाळाराम पाटील यांची निशाणी शिट्टी असून मतदारांनी शिट्टीला मतदान करून विजयी करावे असे आवाहन देखील बाळाराम पाटील यांनी केले आहे.
बाळाराम पाटील यांच्या प्रचार दौर्याची सुरुवात सकाळी 10 वाजता टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन करून करण्यात आली. यानंतर शहरातील मिरची गल्ली, कोळीवाडा, रोहिदास वाडा, पंचरत्न-छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढपुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष पंजाब हॉटेल, मारुती मंदिर, आदर्श हॉटेल, गावदेवी पाडा, कांदेचे घर, रीची रीच दुकान, जयभारत नाका, सावरकर चौक, प्रताप नगर, बिर्मोळे हॉस्पिटल, सहस्त्रबुध्दे हॉस्पिटल,वाल्मिकी नगर,बावन बंगलो,नवीन तहसील कॉर्नर, साईनगर,विट सेंटर, वाजी मोहल्ला, पटेल मोहल्ला, भारत नगर, भुसार मोहल्ला, कच्छी मोहल्ला, जामा मशीद या ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली. दरम्यान बाळाराम पाटील यांचे ठिकठिकाणी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच, बाळाराम पाटील यांना आमदार करायचेच, असा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रचार रॅलीला नागरिकांचा व खासकरून महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.