रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

| नेरळ | प्रतिनिधी |

प्राथमिक शिक्षक समितीचे नेते राजेश जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. नेरळ येथे आयोजित या शिबिरात 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कर्जत यांच्यावतीने शिक्षक नेते स्वर्गीय राजेश जाधव यांच्या स्मरणार्थ तसेच जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय येलवे, जिल्हा सचिव तानाजी गवारी, राज्य कार्यालय चिटणीस किशोर पाटील, कोकण उपाध्यक्ष शायलिक जामघरे, राज्य सदस्य अनिल नागोठकर, जिल्हा उपाध्यक्ष मोंढे, जिल्हा समन्वयक सुरेश चव्हाण, जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर बुरुड, तालुका सचिव मारुती यंदे, तालुका महिला आघाडी प्रमुख सविता बोराडे, तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ पाटील, संतोष मगर, आशिष उंबरे, अनंत खैरे, रुपेश गायकवाड, राजेश गंजेवार, राजेश मेचकर, संजय थोरात उपस्थित होते. सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर झाले.

यावेळी घाटकोपर येथील समर्पण बल्ड बँकेकडून रक्तसंक्रमण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.शिबिरामध्ये 51 रक्तदात्यांनी सहभाग घेतला व 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तालुका अध्यक्ष समीर येरुणकर आणि सर्व पदाधिकारी यांच्या नियोजनाखाली शिबीर यशस्वी झाले.

Exit mobile version