रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात 225 जणांचे रक्तदान
| रेवदंडा | प्रतिनिधी |
जगतगुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, दक्षिणपीठ, नाणीजधाम-महाराष्ट्र यांच्या प्रेरणेने, जीवनदान महाकुंभ 2026 अंतर्गत रक्तदान शिबीर रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे श्रीमद् रामानंदाचार्च संप्रदायाचे वतीने आयोजित करण्यात आला होता. या रक्तदान शिबिरास एकूण 225 रक्तदात्याने रक्तदान करून मोठा प्रतिसाद दिला.
रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी (दि.4) जीवनदान महाकुंभ अंतर्गत रक्तदान शिबीर श्रीमद् रामनंदाचार्य नरेंद्राचार्यजी संप्रदाय यांचे प्रेरणेने चौल रामानंद संप्रदाय सेवाकेंद्र यांच्या वतीने सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत आयोजित करण्यात आला होता. या शिबिरास विद्यश्री चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुबई ब्लड सेंटर खारघर व विक्रम खोपकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तर डॉ. भाग्यश्री विभाष पाटील, सायली विकास घरत, सिध्दी संतोष भगत, प्रचिती उमेश काटकर, कृतिका स्वप्नील घरत, पुजा परशुराम कंटक, श्रध्दा विजय घरत, भक्ती विकास घरत, धनश्री विकास घरत आसिफ शेख यांचे सहकार्य लाभले. यावेळी एकूण 225 जणांनी रक्तदानाचा लाभ घेतला.







